एक्स्प्लोर
दगडूशेठ गणपतीच्या मंडपाचा कळस काढताना कामगार खाली कोसळला
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीसाठी ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. विसर्जनापूर्वी हा देखावा लोकांना पाहता यावा यासाठी त्याचा काही भाग काढण्याचं काम सुरु होतं.
पुणे : दगडूशेठ गणपतीच्या मंडपाचा कळस काढताना क्रेनवरुन एक कामगार खाली पडला. यात त्याला गंभीर ईजा झाली आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास असताना हा प्रकार घडला आहे.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीसाठी ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. विसर्जनापूर्वी हा देखावा लोकांना पाहता यावा यासाठी त्याचा काही भाग काढण्याचं काम सुरु होतं. दगडूशेठ हलवाई मंडळाच्या देखाव्यात तीन कळस आहेत. काल रविवारी पहाटे मुख्य मंडपाचा दत्त मंदिराच्या बाजूचा कळस काढण्यासाठी राम जाधव हा कामगार क्रेनच्या साहाय्यानं वर चढला होता. मात्र तोल गेल्यानं तो मंडपाच्या पत्र्यावर पडला आणि त्यानंतर खाली पडला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.
या कामगाराला तातडीनं रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. दरम्यान हे काम करत असताना या मजुरानं सुरक्षेची कोणतीही साधनं वापरली नसल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement