Pune Rada : राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले, सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
Rahul Gandhi Pune Programme : सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते भिडल्याने मोठा गोंधळ झाला. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली.

पुणे : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' (Chhatron Ki Goonj) या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दोन्ही गटाच्या हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पुण्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 'छात्रों की गूंज' (Chhatron Ki Goonj Pune) हा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी देशभरातील युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्याच्या आधी काँग्रेस आणि एबीव्हीपीमध्ये गोंधळ झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेदेखील पोहोचले आहेत.
Pune ABVP Congress Rada : एबीव्हीपीने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना धमकावल्याचा, तसेच राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत तरुणांना धमकावत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याचं दिसून आलं.
Rahul Gandhi Pune Programme : 'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी
22 ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली. या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश व्यवस्था आणि पुरुष-महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी किमान चार प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात आक्षेपार्ह तसेच धार्मिक भावना दुखावणारा मजकूर किंवा घोषणाबाजी टाळण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.
विविध जिल्ह्यांतून महिला आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News






















