एक्स्प्लोर

प्रसिद्ध बिल्डर दादा साळुंखेंची उजनीच्या पुलाखाली हत्या

साळुंखे हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने माजी अध्यक्ष होते.

बारामती : बांधकाम व्यावसायिक दादा गणपत साळुंखे यांच्या हत्येनं  बारामती तालुक्यात खळबळ माजली आहे. दादा साळुंखे हे बारामतीमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते.  उजनी धरणाच्या पुलाखाली काल संध्याकाळी दादा साळुंखे यांची अज्ञातांनी हत्या केली.  मयताच्या अंगावरील कपड्यांवर बारामतीच्या सिक्वेरा टेलर्सचा उल्लेख होता. त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती, इंदापूर या भागात  मयताचे फोटो सोशल मिडियावरून प्रसारीत करून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह दादा साळुंखे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दादा यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नीला फोन करत काही लोक मला मारत असल्याचे सांगितले होते. संभाषण सुरु असतानाच फोन कट झाला. त्यानंतर तो स्विच्ड ऑफ झाला होता. खरेदी-विक्रीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किंवा उसनेवारी पैशातून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. साळुंखे हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने माजी अध्यक्ष होते. बारामती एमआयडीसीलगतच्या वंजारवाडी येथील ते रहिवाशी आहेत. त्यांच्या आईने वंजारवाडीच्या सरपंच-उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. साळुंखे यांचा एमआयडीसीत गौरव वॉटर सप्लायर्स नावाचा व्यवसाय आहे. दरम्यान, दादा साळुंखे यांचा मोबाईल आणि स्विफ्ट गाडी गायब आहे. दादा साळुंखेंच्या हत्येप्रकरणी अज्ञाताविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपासही सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Embed widget