Pune Accident News: शाळेत निघालेल्या बाप-लेकीला भरधाव ट्रकने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू
पुण्यातील सातववाडीमध्ये चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत शाळेत जात असताना हा अपघात घडला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकारणावाबत नोंद करण्यात आली आहे.
Pune Accident News: पुण्यातील सातववाडीमध्ये चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत शाळेत जात असताना हा अपघात घडला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकारणावाबत नोंद करण्यात आली आहे. यात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे सातववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कंन्टेनर भरधाव वेगात होता. त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. नीलेश साळुंखे आणि मीनाक्षी साळुंखे अशी मृतांची नावे आहेत.
वडील रोजप्रमाणे शाळेत सोडायला निघाले होते त्यावेळी अचानक एका कंटेनरने मागून सात वर्षीय मुलीला धडक देत चिरडले. मीनाक्षी साधना विद्यालयात पाचवीत शिकत होती. निलेश हे फुरसुंगीहून हडपसरकडे आपल्या मुलीच्या शाळेच्या दिशेने जात होते. सातववाडी येथे मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मीनाक्षी दूर फेकल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. सात वर्षीय मुलगी आणि 35 वर्षीय वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सकाळी सातच्या सुमारास घटना घडल्याने त्यांच्यासाठी हा काळा दिवस ठरला आहे.
यापुर्वी स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने एका 12 वर्षाच्या मुलाचा जागीत मृत्यू झाला होता. या झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील वडगाव खुर्द येथे पब्लिक स्कूलची बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने या मुलाचा मृत्यू झाला होता. अर्णव अमोल निकम असं या मुलाचं नाव होतं. शाळेच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएलच्या बस थांब्या स्कूलबस आली होती. बस थांब्यावर अर्णव निकम आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर स्कूल बस वळण घेऊ लागली. त्यावेळी चालकाचे लक्ष नसल्याने काही कळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेले. या घटनेत अर्णवचा दुर्दैवी मत्यू झाला. अर्णवच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या पालकांवर मोठा आघात झाला असून त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.