Pune Crime News: मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु
पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.
Pune Crime News: पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या (Bank) शाखा व्यवस्थापकाने मुंढवा पोलीस ठाण्यात आणि पुणे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअरमध्ये घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुंढवा येथील इंगळे पार्क इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या साधना सहकारी बँकेच्या शाखेच्या मुख्य दरवाजाचं कुलूप चोरट्यांनी फोडलं. बँकेला लागून असलेल्या बालाजी मेडिकलचा दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसराचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. या फुटे याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक अनिल बिनवडे करीत आहेत.
यापुर्वी पुण्यात आयपीएल (IPL) क्रिकेट मॅचमध्ये सट्टेबाजी (betting) केल्यामुळे हरियाणातील (Hariyana) इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. तो विमानाने पुण्यात (Pune) आला होता आणि त्याने आयपीएल मॅचदरम्यान चोरी केल्याचं बिबवेवाडी पोलिसांनी उघड झालं होतं. हरियाणातील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. ट्विंकल अर्जुन अरोरा असे अटक केलेल्याचे नाव होतं. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने तपास सुरू केला होता. फिर्यादीच्या बँक खात्याच्या माहितीनुसार आरोपींनी पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केले होते आणि फिर्यादीच्या हरियाणातील बदरपूर येथील एटीएम कार्डमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. लोहगाव विमानतळावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपीच्या तिकीट बुकिंगवरून त्याचे नाव आणि पत्ता ट्विंकल अरोरा असून ती मूळची हरियाणाची असल्याचे स्पष्ट झाले होते.