एक्स्प्लोर
पिंपरी : मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडून मृत्यू
पिंपरी : मावळ तालुक्यातल्या सांगवडेमध्ये पुलावरुन उडी घेऊन पोहण्याच्या हट्टापायी एक तरुण नदीत बुडाला आहे. सांगवडेतल्या पवना नदीपात्रात आज सकाळी ही दुर्घटना घडली. हा संपूर्ण मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
शनिवारी सकाळी मुद्दतशिर खान आपल्या मित्रांसोबत पवना नदीपात्रात पोहायला गेला. नदीत पोहत असताना अचानक तो पुलावर गेला आणि तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करु लागला. मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता त्यानं उडी मारली आणि हीच उडी त्याच्या जीवावर बेतली.
पुलावरुन त्यानं उडी तर मारली मात्र मध्येच त्याला दम लागल्यानं तो किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.
आज सकाळी बचाव पथकाला त्याचा मृतदेह सापडला.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement