Pune News : वेळ आली होती पण काळ आला नव्हता! पोलिसांच्या सतर्कतेमुळे 60वर्षीय व्यक्तीचा वाचला जीव; घटना CCTVमध्ये कैद
60 वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला असता रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षकांनी जेष्ठ व्यक्तीचा जीव वाचवला. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Pune News: 60 वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला असता रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षकांनी जेष्ठ व्यक्तीचा जीव वाचवला. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रविकांत ढोले 60 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. सांगली येथून पालखी सोहळ्यासाठी पुण्यात आले होते. पालखीचं दर्शन घेऊन परत जात असताना हा प्रकार घडला.
नक्की काय घडलं?
शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढत असताना एका व्यक्तीचा ट्रेनच्या दरवाज्यात पाय घसरून ती व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. ट्रेनचा वेग हळू हळू वाढत होता. तशी ती व्यक्ती आणखी खाली जाऊ लागली. ही गोष्ट जवळच असलेल्या रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक रतन सिंग यांनी त्या व्यक्तीला पाहिले.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. कसलाही विचार न करता त्यांनी त्या ट्रेनमध्ये अडकलेल्या व्यक्तीला वाचवले.
ढोले यांची पालखीच्या किंवा वारीच्या कामात झोप झाली नाही त्यामुळे शिवाजी नगरच्या रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहताना त्यांना झोप लागली. रेल्वे आल्यानंतरही त्यांची झोप उघडली नाही. रेल्वे निघताना त्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी घाईत जाऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. घाईत हा सगळा प्रकार घडला. वेळेच पोलिसांच्या लक्षात आलं नसतं तर यांच्या जीवाना धोका निर्माण झाला असता. हा सगळ्या प्रकार पुणे रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेरऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रवाशाला जीवदान मिळाल्याने उपनिरीक्षक रतन सिंग यांचे आभार व्यक्त करून त्यांनी आरपीएफ विभागाचे आभार मानले आहेत.
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला
या पुर्वीसुद्धा या प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहे. सगळ्या घटना सीसीटीव्हीत कैद देखील झाल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आजपर्यंत अनेक रेल्वे अपघात टळले आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांचं कायम कौतुक करण्यात येतं. मात्र नागरिकांंना अनेकदा सतर्क राहण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात येतं. तरी देखील अपघातांचं प्रमाण कमी होण्याचं चित्र नाही आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
