एक्स्प्लोर

सिंदूर, कंडोम जीएसटीतून मुक्त, सॅनेटरी नॅपकिन का नाही?, तरुणींचा सवाल

  पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सॅनिटरी नॅपकीन्सवरील 12 टक्के जीएसटी कराची जोरदार चर्चा आहे. सॅनेटरी नॅपकिन म्हणजे चैनीची वस्तू, असं म्हणत केंद्र सरकारनं त्यावर जीएसटी लादला आहे. विशेष म्हणजे, सिंदूर आणि कंडोमसारख्या वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. तर सॅनिटरी नॅपकीन्स चैनीची वस्तू कशी? असा सवाल तरुणींकडून विचारला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत मासिक पाळीविषयक जनजागृती करणाऱ्या पुण्यातील रोषनी या स्वयंसेवी संस्थेनं सॅनेटरी नॅपकिनवर जीएसटी तर नकोच, शिवाय ते टॅक्स फ्री किंवा संपूर्ण मोफत असावेत, अशी मागणी केली आहे. यासाठी संस्थेच्या वतीनं अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र लिहिण्यात आलं आहे. एकीकडे भारतासारख्या विकसनशील देशात आजही फक्त 12 ते 15 टक्के मुली आणि महिलाच सॅनिटरी नॅपकिन वापरतात. तर उर्वरीत सुमारे 85 टक्के स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन ही कल्पना माहित नाही. अशा परिस्थितीत 12 टक्के जीएसटीचा बोजा लादून, सरकार नेमकं काय साध्य करु पहात आहे, असा सवाल डॉ. मानसी पवार यांनी विचारला आहे. वास्तविक, मासिक पाळी आली म्हणून शाळा सोडलेल्या अक्षरशः हजारो मुली हे आपल्या देशाचं वास्तव आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा नारा देतात. पण मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याशी थेट संबंध असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर कर कसा, असं बोलत तरुणींकडून याचा निषेध केला जात आहे. सध्या बाजारात किमान 100 रुपयांपासून पुढे मिळणारे सॅनिटरी नॅपकिन परवडत नाहीत, म्हणून मुली ते वापरायला ही बघत नाहीत. त्यातून निर्माण होणारी इन्फेक्शन्स आणि उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी हे अनेक मुलींच्या आयुष्यातील वास्तव चित्र आहे. शाळा, कॉलेजेस, रेल्वे स्टेशन्स, बस स्टॉप आणि ऑफिस अशा जागी सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशिन्स का नाहीत हा स्वाभाविक प्रश्न ही मुली विचारतात. सिंदूर, बिंदी, कांडोम आदी गोष्टी जीवनावश्यक म्हणणाऱ्या सरकारनं मासिक पाळी आणि सॅनेटरी नॅपकिनकडे बघायची नजर बदलावी, असं या मुलींना वाटत आहे. 'स्वच्छ भारत' किंवा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या गोष्टी केवळ घोषणांपुरत्या नकोत असं प्रातिनिधिक मत ही त्या व्यक्त करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget