एक्स्प्लोर
Advertisement
टेमघर धरणाचं काम निकृष्ट आणि धोकादायक : गिरीश महाजन
पुणे : टेमघर धरणाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती धोकादायक आहे, तसंच धरणाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलं आहे. श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचंही महाजन म्हणाले.
15 वर्षापूर्वी टेमघर धरणाचं बांधकाम करण्यात आलं. मात्र काही वर्षांपासून धरणाच्या भिंतीतून धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
टेमघर धरणाच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असली तरी धरणाला मोठा धोका नाही, असा अजब तर्क जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी लावला होता. धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणीगळतीची बातमी ‘एबीपी माझा’नं दाखवल्यानंतर महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली होती.
पाहणी केल्यानंतर या धरणाला फार मोठा धोका नसल्याचं प्रमाणपत्रं महाजन यांनी देऊन टाकलं. त्यामुळे जलसंपदामंत्री महाजन कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता कारवाई होत असल्याने
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement