एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, चौघांचा मृत्यू
शहरात अचानकपणे स्वाईन फ्लू फोफावत असतानाच पालिकेच्या रुग्णालयात जुलैपासून स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र उपाययोजना सुरु असल्याचा दावा, छातीठोकपणे केला जातोय.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढू लागला आहे. आत्तापर्यंत स्वाईन फ्लूने चौघांचा जीव घेतला आहे. असं असताना पालिकेच्या रुग्णालयात जुलैपासून स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नाही. आकुर्डी येथील छपन्न वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इसमावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सलग दुसऱ्या दिवशी स्वाईन फ्लूने रुग्णाचा बळी घेतलाय. जानेवारी ते 10 ऑगस्ट पर्यंत मृतांचा आकडा एकवरच होता, मात्र गेल्या दोन आठवड्यात स्वाईन फ्लूने चौघांचा जीव घेतलाय. तर तिघांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. अन्य आठ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
शहरात अचानकपणे स्वाईन फ्लू फोफावत असतानाच पालिकेच्या रुग्णालयात जुलैपासून स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र उपाययोजना सुरु असल्याचा दावा, छातीठोकपणे केला जातोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement