Swargate bus depo Crime: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चोपलं
Swargate bus depo Crime: काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस आगारामध्ये काही दिवसांपुर्वी एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्य हादरलं होतं. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावरती हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण झाल्यानंतर दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दत्ता गोडेचे वकील वाजीद खान यांचे साहिल डोंगरे सहायक वकील आहेत.
काही दिवसांपुर्वी स्वारगेट आगारामध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावरती आता जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण झाल्यानंतर दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती. फलटणला निघालेल्या तरुणीला चुकीच्या शिवशाही बसमध्ये नेऊन आरोपीनं अत्याचार करण्यात आला. स्वारगेट एसटी आगार परिसरात तरुणीवर बलात्कार झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अखेर आज 28 फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने स्वत: कंडक्टर असल्याचं भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास मिळवला. आरोपीने तरूणीला चुकीची बस दाखवली होती. तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती. बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली. मात्र, आरोपीने तरूणीला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

