Supriya Sule on Rajya Sabha Election 2022: "अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन होता है", भाजपच्या विजयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule on Rajya Sabha Election 2022: कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर सगळीकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा होत आहे. या विजयानंतर सगळीकडून त्यांचं कौतुक होतंय.
भारतीय जनाता पक्षाला शुभेच्छा, शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती. परंतू त्यात यशस्वी झालो नाही.
महाविकास आघाडीची मते एकत्र राहीली. मात्र जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते ते आमच्यासोबत आले नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीला थोडासा धक्का सहन करावा लागला, असंही त्या म्हणाल्या. आमच्याकडे फार संख्याबळ नव्हतं तरीदेखील आम्ही जोमाने प्रयत्न केले. शरद पवारांना अमिताभ बच्चनची उपमा देत त्यांनी कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, अशी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीला गरज असताना देखील संजय शिंदे यांचं मत मिळालं नाही. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का? हा देखील प्रश्न आहे, असं म्हणत त्यांनी अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते सत्तेत आहेत. 50 वर्षांहून काळ आमच्या नेत्यांनी राजकारणात उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यापैकी अर्धी वर्ष ते सत्तेत होते तर काही वर्ष विरोधात होते. असंही त्या म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचा 'मविआ'वर निशाणा
'अकेला देवेंद्र क्या करेगा' असं म्हणणाऱ्यांना विजयानंतर करेक्ट कार्यक्रम म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघांनी उत्तर दिलं आहे. हा भाजपचा शानदार विजय आहे, असंही त्या म्हणाल्या. पुण्याच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपचे तिनही उमेदवार विजयी झाले. अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पीयुष गोयल हा देवेंद्र फडणवीस यांना चमत्कार आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असंही त्या म्हणाल्या.