Supriya Sule : विधानसभेत रमी कोण मंत्री खेळत होता? दिल्लीतील खासदार थांबवून थांबवून विचारतात: सुप्रिया सुळे
Maharashtra Politics: वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, महादेव मुंडे यांच्या हत्येकरांवर कारवाई केली जात नाही याची तक्रार अमित शाहांकडे करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

पुणे : राज्यात जे काही सुरू आहे त्यावरुन मुख्यमंत्री नाराज आहेत, दिल्लीमध्येही त्याची मोठी चर्चा सुरू आहे. दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण आहे? असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. वाल्मिक कराडमागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट देऊन मंत्रिमंडळात घेणार असाल तर त्याला आम्ही विरोध करू असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यामध्ये बोलत होत्या.
पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांनी मीटिंग घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढच्या काही दिवसात होतील. स्थानिक नेत्यांच मार्गदर्शन घेऊन पुढ जाणार आहोत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
Manikrao Kokate Video : मंत्र्याच्या रमीची दिल्लीत चर्चा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्रात भरपूर काही सुरू आहे. राज्यात क्राइम वाढलं आहे, पुण्यात देखील भरपूर क्राईम वाढलं आहे. राज्यावर आर्थिक बोजा वाढला आहे. राज्यासमोर मोठी आव्हान आहे. दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते, मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे. दिल्लीतले खासदार मला थांबवून थांबवून विचारत होते की रमीचा काय प्रकार सुरू आहे, कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे. असे अनेक प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले जातात. राज्यात कुठलीही घटना घडली की देशभर जाते. राज्याची देशभरात प्रचंड वाईट इमेज तयार झाली आहे."
ज्यावेळेस पहिला व्हिडीओ समोर आला त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामे द्या, स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत. महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार?
महिला मंत्री काहीतरी नवीन करत असेल तर विरोध का?
भाजपच्या मंत्री माधुरी मिसाळ आणि शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्यातील वादावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माधुरीताई महिला आहेत, एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते तर असं बोलायचं. माधुरीताई मंत्री झाल्या आहेत, त्या काहीतरी करू पाहत आहेत तर काय अडचण आहे? चौकटीत राहून आणि प्रोटोकॉल पाळून त्या काम करत आहेत."
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "उशिरा का होईना मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे.मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडला सांगितल आहे की राज्यात चुकीचं होत आहे. मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली, या हत्येच्या मागे वाल्मिक कराड होता. त्याचा आका नेमका कोण होता हे सुरेश धस यांनी अनेकदा सांगितले आहे. या आकामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना क्लीन चिट कसली देता? लोकांची घर उद्ध्वस्त होत आहेत आणि तुम्ही कसली क्लीन चीट देत फिरत आहात. अशा लोकांना आम्ही महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येऊ देणार नाही."
गेल्या 150 दिवसात महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. याचा जबाब या सरकारला द्यावे लागेल. वाल्मिक कराड जेलमधून फोनवर बोलत आहे. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे. याची तक्रार करण्यासाठी आम्ही अमित शाहांची वेळ मागितली आहे. तसेच महादेव मुंडे प्रकरणावरही अमित शाहांशी बोलणार आहोत.
ही बातमी वाचा:























