Supriya Sule on Pune Mahapalika : पावसासंदर्भातील कामं पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरु; सुप्रिया सुळेंचा पुणे महापालिकेला इशारा
Supriya Sule on Pune Mahapalika : पुढील 10 दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे.
Supriya Sule on Pune Mahapalika : पुढील 10 दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 11) पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अशी वेळ पुणेकरांवर का आली आणि ही पावसापूर्वीची कामं अजूनही पूर्ण का झाली नाहीत? असा जाब विचारला.
पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते देखील ब्लॉक झाले
पुण्यात शनिवारी (दि.11) पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सुन महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पु्ण्यातील अनेक परिसरात पाणी साचले. पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते देखील ब्लॉक झाले होते. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुण्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. "पुण्यात समुद्र नाही, याची पुणेकरांना कायम खंत होती, म्हणूनच भाजपने पुण्यात समुद्रही आणला", असा टोलाही जयंत पाटील यांनी केला.
पुण्यातील उपाय योजनांबाबत सुप्रिया सुळे आक्रमक
पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शहरात 31 ठिकाणी झाडं पडली होती. दरम्यान, पावसामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू झाल्याने कमी वेळात अधिक पाऊस झाला. काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती होती. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता सुप्रिया सुळे पुण्यातील उपाय योजनांबाबत आक्रमक झाल्या आहेत.
दौंड आणि गार या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरु असताना एक पिलर कोसळला. गेली तीन चार दिवस सुरू असलेल्या पावसानंतर पिलरची ही अवस्था झाली. हि गंभीर घटना आहे. पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत देखील यामुळे प्रश्न उपस्थित होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम का…
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2024याचा नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे हे पाणी तुंबले असे नागरीकांचे म्हणणे आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) June 9, 2024
इतर महत्वाच्या बातम्या