एक्स्प्लोर

Ajit Pawar : राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळेल. त्यामुळे सहकार चळवळ अधिक मजबूत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या 'राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र' उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करुन सहकार चळवळ टिकवण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले.


Ajit Pawar : राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हा

स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील अजित पवार दिली.


Ajit Pawar : राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करा

देशपातळीवर होत असलेल्या सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी पोकळी भरण्याची क्षमता नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. या संधीचा फायदा घेतांना बँकेच्या कामकाजासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. सहकारी सोसायट्यांचे नाबार्ड आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले. आबासाहेब शिंदे यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यामुळे महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली. नव्या पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेऊन सहकार क्षेत्रात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Embed widget