एक्स्प्लोर

Pune : श्रीकांत इंगळहळीकर यांनी पॅडी आर्टच्या माध्यमातून भातशेतीवर साकरला कृष्ण गरुड

पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. भरारी घेतलेल्या गरुडाचे‌ हे चित्र हिरव्या काळ्या भातरोपांच्या लावणीतून तयार केले आहे.

पुणे : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील प्राणी, पक्षी चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर साकारणारे हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग सातव्या वर्षी पॅडी आर्ट साकारण्यात आले आहे. त्यांनी शेतामध्ये  'कृष्ण गरूड' अर्थात 'ब्लॅक ईगल' (Black Eagle) साकारला आहे.

पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. भरारी घेतलेल्या गरुडाचे‌ हे चित्र हिरव्या काळ्या भातरोपांच्या लावणीतून तयार केले आहे. कृष्ण गरूड सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावरच्या सदाहरित जंगल उतारांवर दिसतो. पिवळी चोच आणि पाय याखेरीज या गरुडाची पिसे काळी असतात. झाडांलगत तरंगत पक्षी, साप, खारी अशी भक्ष्ये शोधताना दिसतो. भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, आंबोली या दाट जंगलांवर काळ्या रंगामुळे आणि घुटमळत तरंगण्याच्या सवयीमुळे सहज ऒळखता येतो. पावसाळ्यात ढगांमुळे त्याला भक्ष्य दिसत नसल्याने कमी पावसाच्या डोंगरांवरही दिसतो. यंदा साकारलेला  'कृष्ण गरूड' किंवा 'ब्लॅक ईगल' हा सुमारे 80 फूट (रुंद) लांब आहे.

सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा जवळील  लेक्सॉन वाइंडर्स येथे बघायला मिळू शकते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे 'पॅडी आर्ट' प्रथमच पुण्यात आणले. 'पॅडी आर्ट' साकारताना जमिनीचा एका 'कॅन्व्हास'सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले.

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात 'पॅडी आर्ट' चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतक-यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून 'पॅडी आर्ट' अर्थात 'टॅम्बो अटा' ही कला 1993 मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget