शिरुर, पुणे : कांद्यावरील निर्यातबंदी उठणं  (Onion)हे स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र आज घेतलेला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी  (Amol Kolhe)शंका उपस्थित केली आहे. संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयाचा दाखला देताना, बांग्लादेश सारख्या छोट्या देशासमोर स्वतःला विश्वगुरु म्हणवणाऱ्यांना गुडघे टेकायला लागले होते. याची आठवण कोल्हेनी कांदा निर्यातबंदी निर्णयावर शंका उपस्थित करताना करून दिली. 


आधी फक्त गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्यात आली होती. त्यावर कोल्हेंसह मविआ नेते तुटून पडले. यामुळं महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला. ही बाब भाजप सरकारच्या लक्षात आली. याची किंमत लोकसभा निवडणुकीत मोजावी लागू नये म्हणून भाजपने पुढच्या काही तासांत गुजरातसह देशभरातील 99 हजार मेट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय तातडीनं घेतला. पण पूर्वानुभव पाहता कोल्हेंनी हा निर्णय तपासून घ्यावा, अशी शंका उपस्थित केली आहे.


केंद्र सरकारने 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. 2 हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती व काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील 2 हजार मे. टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यावरुन, महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद रंगला होता. त्यात अमोल कोल्हेंनी सरकारवर टीका केली होती. भाजप सरकार सर्वात कमी कांदा उत्पादन घेणाऱ्या गुजरातमधील कांद्याची निर्यातबंदी हटवते, म्हणजे महाराष्ट्रासह इतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता नाही का? असं म्हणत कोल्हेंनी भाजपच्या निर्णयाचा  विरोध केला होता.  तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे. जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला कोल्हे यांनी कडाडून विरोध केला होता. 


इतर महत्वाची बातमी-


Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी


Ravindra Dhangekar : पुण्यात महाविकास आघाडीत धूसफूस सुरुच; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये