बुलढाणा : इंदोर - अकोला मार्गावर खासगी बसचा (Private Bus Accident) मोठा अपघात झाला आहे. इंदोरहून (Indore To Akola) अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवाशी बस दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस 100 फूच खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताची माहिती घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. बसमधील 28 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.या सगळ्या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सकाळी साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला. इंदोरवरुन अकोल्याकडे ही बस निघाली होती. मात्र मध्येच ही बस जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात दरीत कोसळली. रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस होती. जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झालं. मध्यप्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पाहणी करताच 28 रुग्ण जखमी असल्याचं दिसलं. या सगळ्या जखमींना दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. 28 जखमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत.