आंबेगाव : पुण्यातल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) सडकून टीका केलेली आहे. मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रकार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं, असं अजित पवार म्हणाले. मी केलं, मी केलं, मी केलं अशी सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकासकामांवरुन अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. आंबेगाव परिसरात एमआयडीसी आणणार, असं आश्वासन देखील आहे.
भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही!
सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामं छापण्यात आले आहेत. त्यानं ही सगळे कामं त्यांनी केल्याचं सध्या दाखवलं जात आहे. बारामतीतील सगळ्या इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकांत दिसत आहे. सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत. ही कामं केली असेल तर भोर, वेल्हा आणि मुळशीत काय केलं ते दाखवा, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. नुसती भाषणं करु होत नाही. भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल, असाही टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
मी तुमचा विकास करेन पण..
भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी आहे. मग बारामती, इंदापूर आणि दौंड मधील तरुणांनी काय घोडं मारलं आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मी तुमचा विकास करेन पण तुम्हाला घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटन दाबावे लागेल. आधीचा खासदार मोदी साहेबांना विरोध करायला जायचा. आताचा खासदार मोदी साहेबांना मदत करायला जाईल. मोदींचं बजेट खूप मोठं आहे, असंही अजित पवार म्हणाले. आधीच्या खासदारांनी मोदींना विरोध केल्याने मतदारांचे नुकसान झालं असल्याचंही ते म्हणाले.
मी ढगात गोळ्या मारत नाही!
काहीजणांनी वल्गना केल्या की निवडून आले की भोर- वेल्ह्यात इंडस्ट्री आणू. मग आतापर्यंत का आणली नाही, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. त्यासोबतच भावनिक न होता मतदान करा.मला विकास करण्याचा अनुभव आहे. मी रात्री एकला झोपलो तरी सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो. मी ढगात गोळ्या मारत नाही, खोटं बोलत नाही, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.
इतर महत्वाची बातमी-