शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाकडे (Shirur Loksabha Election) सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिरुरमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. महायुतीकडून आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) पाडणार म्हणजे पाडणार, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर आता अमोल कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरणार आहे


लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार  अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.


शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत.


शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन


शिरूर - हवेली विधानसभा
28 एप्रिल - उरळीकांचन, या. हवेली 
जुन्नर विधानसभा
30 एप्रिल - ओतूर बाजार, ता. जुन्नर 
हडपसर विधानसभा
6 मे - कात्रज
भोसरी विधानसभा
7 मे - मा. आदित्य ठाकरे यांची रॅली 
आंबेगाव - शिरूर विधानसभा
8 मे - रांजणगाव, ता. शिरूर 
खेड - आळंदी विधानसभा
10 मे - चाकण बाजार समिती आवार 
जुन्नर विधानसभा
11 मे - सांगता सभा राजुरी, ता. जुन्नर


महायुतीकडूनही जोरदार प्रचार


शिरुरमध्ये महायुतीकडूनदेखील सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिलला सभा घेणार आहेत. त्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यावेळी शिरुर लोकसभेच्या अनेक कार्यकर्त्यांनादेखील उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहे. शिरुरची जागा जिंकणं हे अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे. त्यामुळे अजित पवारांकडून शिरुर लोकसभा मतदार संघावर आणि बारामती लोकसभ मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


AjIt Pawar And Sanjog Waghere : अण्णा बनसोडेंच्या लेकीच्या लग्नात अजित पवार-संजोग वाघेरे समोरा-समोर, वाघेरे थेट पडले, दादा अवघडले!