एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : बारामतीच्या तथाकथित 'जाणता राजा'चा हात लागला तर राख होते, हे प्रत्यक्षात बघितलं; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पूर्णपणे संपवायचं होतं ते त्यांनी केलं, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Gopichand Padalkar :  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे, असं शरद पवारांनी (sharad pawar) म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पूर्णपणे संपवायचं होतं, ते त्यांनी केलं, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते. एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होत आहे. आता शिवसेनेचं काय झालं ते आपल्या समोर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. यांना मशाल आता रुजवायला वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचा  जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असं  मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन मात्र फक्त ते खंजीर एकमेकांत घुसवू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला. 

'सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे'

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतो ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पहिजे आणि हा मुद्दा आम्ही सरकारकडे लावून धरत आहोत, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी एमआयडीसी आगर येथे सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य एमआयडीसी शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.  काही चुकीच्या नियमामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय होतो. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही याासाठी काम करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट  केलं, 

राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी यांची संख्या करोडोच्या घरात आहे आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन काही लोकांनी अनेक संघटना केल्या कर्मचाऱ्यांना न्याय न देता कर्मचाऱ्यांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला. त्या कर्मचाऱ्यांचे शोषण केलं. संघटना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करीत होत्या, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर ही संघटना उभी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 'शिवसेना सत्तेत असताना एकाला पण विमा मिळाला नाही'
अर्थमंत्र्यांनी घोषणा केली होती की ज्या कर्मचाऱ्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन पर 50,000 देऊ मात्र त्यांना ते द्यायला जमलं नाही. आमच्या सरकारने ते निर्णय करून लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवसेना सत्तेत असताना एकाला पण विमा मिळाला नाही, असं ते म्हणाले. 

आमचे दोन्ही नेते घरात बसणारे नाहीत: गोपीचंद पडळकर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीचा दौरा केला. विरोधी पक्ष तीन महिन्यापूर्वी सरकारमध्ये होता हे विसरून गेला आहे. त्यांची तीन महिन्यापूर्वीची भाषणे काढा आणि आताचे भाषण काढा त्यामध्ये प्रचंड तफावत दिसून येईल. आम्ही विश्वासघाताने विरोधात गेलो होतो परंतु आम्ही शेतकऱ्यांची ठामपणे बाजू लावून धरत होतो. आता सरकारमध्ये आलो आहोत तर आमचे दोन्ही नेते घरात बसणारे नाहीत हे फिल्डवरती जाणारे आहेत, मदत करणारे आहेत आणि शेतकऱ्यांना माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे की तुमच्या बाजूने सरकार आहे. तुम्हाला जिथे जिथे अडचण येतील तिथे तिथे सरकारकडून मदत होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या बाजूने सरकार ठामपणे उभा
चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले हे कोणी विसरता कामा नये. आठ- दहा तास त्या विषयावरती काम करताना मागच्या सरकारमध्ये आम्ही स्वतः त्यांना बघितले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठा समाजाचा आरक्षण गेलं. आता तुम्ही परत सरकार आल्यानंतर काहीतरी तोडफोड करायचा प्रयत्न करत आहात मात्र मराठा समाजाच्या बाजूने सरकार ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी मराठा समाजाला दिला. 

ही बातमी देखील वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget