एक्स्प्लोर

स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून पवारांच्या खाणाखुणा

स्तुती नको, भाषण आवरा असं म्हणण्याची वेळ खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली.

बारामती (पुणे): एखाद्या वक्त्याने मंचावरील उपस्थित मान्यवरांची स्तुती करणं हे तसं सामान्य आहे. पण स्तुती नको, भाषण आवरा असं म्हणण्याची वेळ खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली. ज्येष्ठ नागरिकांची पल्लेदार आणि विसंगत भाषणं ऐकून शरद पवारांनी डोक्याला हात लावून, भाषण आवरण्याच्या सूचना केल्या. बारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयवदान आणि इतर उपकरणांचं वितरण करण्यात आलं. मात्र यावेळी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी योजनेविषयी न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंचावर उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी डोक्याला हात लावला.  आणि लाभार्थींचं मनोगत थांबवण्याच्या सूचना केल्या. स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून पवारांच्या खाणाखुणा हा सर्व प्रकार घडला तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्षपाल गुर्जर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघातील साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना  वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये एकूण 3270 लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून पवारांच्या खाणाखुणा यावेळी लाभार्थी वृद्धांना मिळालेल्या वयोश्री योजनेबाबत मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं. काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत मांडण्यात सुरुवात केली. पण त्यांनी या योजनेच्या लाभाऐवजी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विषयी गोडवे गाऊ लागले. यात त्यांनी "साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे", "साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावेत", "साहेब तुम्हाला 101 वर्षाचे आयुष्य लाभो", " साहेबांनी कोंबड्यापासून जनावरांपर्यंत सगळे काही दिले" असे म्हणत या केंद्र सरकारच्या कार्यक्रमात आणि खुद्द शरद पवार यांच्यासमोर पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केल्यामुळे, शरद पवारांनी त्या नागरिकांस तात्काळ थांबण्याची विनंती केली. दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकानेही उठून पहिल्याचीच री ओढली. यावेळेस पवारांनी मात्र डोक्याला हात लावून पुन्हा त्या व्यक्तीला थांबवण्याच्या सूचना केल्या. या योजनेच्या लाभाऐवजी हे नागरिक पक्षाचेच गुणगान गात असल्याने, हा प्रकार होत असताना सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

J&K Loc War Tension : भारत आणि पाकिस्तान सीमेवर दहशतीचं वातावरण, गोळीबारापासून रश्क्षण करण्यासाठी बंकर बांधण्यास सुरुवातJammu Amusement Park : पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्याआधी दहशतवाद्यांकडून चार ठिकाणांची रेकीKedarnath Yatra 2025 Begins : केदारनाथ यात्रेला सुरुवात, पंचमुखी पालखी मंदिर परिसरात दाखल, थेट आढावाIndia On Pakistan : पाकिस्तानला भारत नवीन धक्का देण्याच्या तयारीत, पाकिस्तानसाठी जलवाहतूक, पोस्टसेवा निलंबित करण्याचा विचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Prakash Mahajan on Sharad Pawar : शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
धक्कादायक! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली
धक्कादायक! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली
संविधानाचा मूळ पाया कुणालाही..; जातनिहाय जणगणनेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया
संविधानाचा मूळ पाया कुणालाही..; जातनिहाय जणगणनेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया
मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; दहशतवादी हल्ल्यापूर्वी 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शींने सांगितला थरारक प्रसंग
मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; दहशतवादी हल्ल्यापूर्वी 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शींने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget