एक्स्प्लोर

Santosh Deshmukh: 'इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करतेय...', संतोष देशमुखांच्या लेकीचा संतप्त सवाल, म्हणाली, आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची?

Santosh Deshmukh Murder Case : ' शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकने एक व्हिडीओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केलाय. त्यावरती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने पोलिसांच्या कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Beed Walmik Karad Surrender : बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये कराडने शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 22 दिवस उलटले आहेत. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकने एक व्हिडीओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केलाय. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होतो आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय रोषासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने पोलिसांच्या कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

काय म्हणाली वैभवी देशमुख?

"माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, इतके दिवस झाले पोलीस यंत्रणा काम करते आहे. पण त्यांना इतका वेळ का लागत आहे, ते गुन्हेगार असतील तर ते स्वतः सरेंडर होत आहेत. तर मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे. त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर, आम्ही न्यायाच्या पेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे. ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली. जे तीन आरोपी फरार आहेत, लवकरात लवकर अटक करावी नुसार आणखी ज्या आरोपी आहेत, त्यांनाही ताब्यात घ्यावं, कारवाई करावी आणि  माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे असे वैभवीने पुढे म्हटलं आहे.

वाल्मिक कराड कोण आहेत?

वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिक कराडने पाहिली आहे. धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहे. जिल्ह्यातील सरकारी, सामाजिक सर्व कार्यक्रम कराड पाहतो. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचा. वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात असून वाल्मिक कराड सध्या फरार होता, त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर आज अखेर वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDhananjay Munde News : मी राजीनामा दिलेला नाही, विरोधकांच्या मागणीवर धनंजय मुंडे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Embed widget