Sanjay Jagtap : विजय शिवतारे खोटारडा आणि बाजार बुणगा माणूस; पुरंदरमध्ये 32 हजार मतदार बोगस असल्याच्या आरोपावर संजय जगतापांचे सनसणीत उत्तर
Sanjay Jagtap : बोगस असल्याचं सांगत 32 हजार मतदारांना एकाच वेळी नोटिस दिली, त्यांना एकाच दिवशी बोलावलं, मग त्यांची सोय काय करणार? असा प्रश्न पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला.
पुणे : पुरंदरमध्ये 32 हजार मतदार हे बोगस असल्याचं म्हणणारा विजय शिवतारे (Vijay Shivtare) हा खोटारडा आणि बाजार बुणगा माणूस असल्याची टीका काँग्रेसचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी केला. एकाच वेळी 32 हजार लोकांना नोटिस देणाऱ्या प्रशासनाने तेवढे लोक एकाच दिवशी आले तर काय करणार याचीही माहिती द्यावी असं ते म्हणाले. राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं.
पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये 32 हजार बोगस मतदार नोंद (Purandar Bogus Voter) असल्याचा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. या आरोपानंतर आता पुरंदरचे आमदार संजय जगताप हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. विजय शिवतारे बाजार बुनगे असल्याचं संजय जगताप म्हणाले आहेत. 32 हजार लोकांना निवडणूक आयोगाच्यावतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यांना 4 जानेवारीला सासवड येथे बोलण्यात आले आहे. यासंबंधी आमदार संजय जगताप यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.
32 हजार लोकांची काय सोय केली?
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन आमदार संजय जगताप यांनी निवडणूक विभागाला याचा जाब विचारला. 32 हजार लोक एकाच दिवशी येणार असतील तर त्यांच्यासाठी काय सोय केली आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. यापूर्वीच आम्ही याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्याच्यावर कोणती कारवाई झाली? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आणि युवा सेना तालुका अध्यक्ष या दोघांच्याही कुटुंबीयांची नावे दोन गावात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल आमदार संजय जगताप यांनी विचारलाय.
संजय जगताप यांना नोटिस
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांना मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असल्याच्या कारणावरून नोटिस धाडण्यात आली आहे. 4 जानेवारीला आमदार संजय जगताप यांना कागदपत्रे घेऊन पुरंदर येथील उपविभागीय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर हवेलीमध्ये 32 हजार बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता. हे सर्व बोगस मतदार विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघातील असल्याचा देखील आरोप विजय शिवतारे यांनी केला होता. त्यावर आमदार संजय जगताप यांनी प्रतिक्रिया दिली होती की, सरकार तुमचे आहे चौकशी करा आणि कारवाई करा.
त्यानंतर पुरंदर मधील अनेक मतदारांना नोटिसा गेल्या आहेत. आणि 4 जानेवारीला तालुक्याच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितला आहे. अशाच प्रकारची नोटीस आमदार संजय जगताप यांना देखील केली आहे. जर हजर राहिला नाहीत तर मतदार यादीतून नाव काढले जाईल अशी नोटिस धाडल्याने आमदार संजय जगताप आक्रमक झाले आहेत.
ही बातमी वाचा: