एक्स्प्लोर

Pune Bypoll election : संभाजी ब्रिगेड अन् 'आप'ची पुणे पोटनिवडणुकीतून माघार; राहुल कलाटेंच्या निर्णयाकडे नजरा

संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षांच्या वरिष्ठांच्या आदेशाने निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. 

Pune Bypoll election :  पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी (pune bypoll election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जितक्या जास्त उमेदवारांनी  अर्ज मागे घेतला तितका जास्त फायदा भाजप आणि महाविकास आघाडीला होणार आहे. यामुळे मत फुटण्याची शक्यता कमी होणार आहे. यात संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षांच्या वरिष्ठांच्या आदेशाने निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. 

संभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार घेतली आहे. पुण्यातील कसबा आण चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटी तारीख आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही माहिती दिली आहे. 

आम आदमी पक्षाचीही माघार

संभाजी ब्रिगेडनंतर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाले होते. मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी आपचे प्रभारी गोपाळ इटालिया पुण्यात आले होते. त्यांनी आता पुण्याच्या पोटनिवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. त्यानुसार पक्ष  श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत, असं आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

राहुल कलाटेंच्या उमेदवारी अर्जाकडे सर्वांची नजर

यात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला उमेदवारी अर्ज असेल तर तो चिंचवडच्या शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा आहे. त्यांनी निवडणूक अर्ज मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून विनवणी केली जात आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, अजित पवार, सुनील शेळके आणि आता शिवसेनेचे सचिन अहिर यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वाजता अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. मात्र अजूनही राहुल कलाटेंनी निवडणूक अर्ज मागे घेतलेला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Suraj Chavan Welcome Home Baby Girl: 'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Kieron Pollard: तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Embed widget