एक्स्प्लोर

Sai Kawade : 'हवामानामुळे मोहीम थांबली पण तो थांबला नाही'; पुण्याच्या साई कवाडेने सर केला दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च पर्वत

पुण्याच्या 14 वर्षीय साई कवाडे याने प्रजासत्ताक दिनी 4,370 मीटर अंतर पार करून दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोंकागुआ या ठिकाणी तिरंगा फडकवला आहे.

Sai Kawade :  'हौसले बुलंद हो तो मंजिले दूर नहीं होते',  हेच वाक्य पुण्याच्या 14 वर्षीय साई कवाडे (sai Kawade) याने खरं करुन दाखवलं आहे. प्रजासत्ताक दिनी 4,370 मीटर अंतर पार करून दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोंकागुआ या ठिकाणी तिरंगा फडकवला आहे. दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोंकागुआ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पर्वत सर करत त्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

साई अल्पवयीन असल्याने अर्जेंटिनामधील गिर्यारोहणाच्या नियमांनुसार कायदेशीर मान्यता आवश्यक होती. त्यामुळे साई आणि त्याच्या वडिलांनी  अर्जेंटिनामधील न्यायालयाकडून मान्यता मिळवली. अर्जेंटिनामधील न्यायालयाने कायदेशीर अटी आणि प्रक्रिया मंजूर केल्या आणि साईने 17 जानेवारी रोजी मोहीम सुरू केली. सहकारी ट्रेकर डॉ. सीमा पाटील आणि अंबादास गायकवाड यांच्यासोबत साईच्या टीमने दोन दिवसांनंतर 4,370 मीटर उंचीवर असलेल्या प्लाझा डी मुलास बेस कॅम्पवर पोहोचण्यासाठी पुएंटे डेल इंका कॅम्प आणि कॉन्फ्लुएन्सिया कॅम्पच्या कठीण पॅचमधून मार्ग काढला. हा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा मानला जातो. 

हवामानामुळे मोहीम थांबवली पण...

हिमवादळामुळे हवामानावर परिणाम झाला होता. तापमान -20 डिग्री सेल्सियस ते -30 डिग्री सेल्सियस दरम्यान होते आणि वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यावेळी ही मोहीम तीन दिवसांसाठी थांबवण्यात आली होती पण वातावरणात सुधारणा होत नसल्याने डॉक्टर आणि रेंजर्सच्या मार्गदर्शकाने मोहीम थांबवण्याचा आणि पुढे न चढण्याचा निर्णय घेतला होता. हवामान खराब असतानाही साईने 26 जानेवारी रोजी देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी प्लाझा डी मुलास बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला.

साईने यापूर्वीही केले कठीण ट्रेक

साई भारती विद्यापीठ शाळेत आठवीत शिकतो. तो उत्तम गिर्यारोहक आहे आणि त्याने स्टोक कांगरी शिखर, आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर आणि युरोपमधील एल्ब्रस शिखर तसेच गेल्या वर्षी तेनझिंग हिलरी एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण केली आहे. त्याच्या मोहिमांसाठी त्रियामा लीगल, पुनित बालन ग्रुपचे ऑक्सीरिच, एमबीए आणि लायन्स क्लब पुणे यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली आहे. 

पुढील टार्गेट

साईचा ट्रेकींगचा प्रवास इथंपर्यंत थांबणार नाही आहे तर त्याला जगातील अनेक मोठे मोठे ट्रेक करायचे आहे. सध्या तो 14 वर्षांचा आहे. दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनकाग्वा नंतर त्याला अमेरिकेतील माऊंट डेनालीवर चढण्याचे आहे.  आतापर्यंत पूर्ण केलेल्या ट्रेकच्या मागे त्याची जिद्द आणि मेहनत आहे, असं त्याचे वडील सुधीर कवाडे सांगतात.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget