एक्स्प्लोर
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर संघाचे हेडगेवार, गोळवलकर गुरुजी

पुणे: पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राजाभाऊ गोरडे यांनी प्रचाराच्या बॅनवर चक्क संघाचे संस्थापक हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांचे फोटो लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. गोरडे पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 (ब) बावधान कोथरुड डेपोमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. राजाभाऊ गोरडे हे डिसेंबर 2012 पासून भाजपमध्ये होते. मात्र भाजपनं उमेदवारी न दिल्यानं गोरडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन तिकिट मिळवलं. गोरडे हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. 2007 ते 2012 याकाळात ते मनसेचे नगरसेवक होते. पण ज्या राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध केला आहे. त्याच पक्षाच्या प्रचाराच्या बॅनरवर संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो झळकल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय






















