एक्स्प्लोर

Baramati Crime News:  सख्खा भाऊच ठरला वैरी! कुऱ्हाडीने वार करत घेतला सख्या भावाचा जीव

सख्ख्या भावाने भावाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे. शेतात भावाने एक लाकडाचे ओंडके आडवे टाकले म्हणून वैतागलेल्या दुसऱ्या भावाने कुऱ्हाडीने वार केले त्यात भावाचा जीव गेला.

Baramati Crime News:  सख्ख्या भावाने भावाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बारामती (baramati crime) तालुक्यात घडली आहे. शेतात भावाने एक लाकडाचे ओंडके आडवे टाकले म्हणून वैतागलेल्या दुसऱ्या भावाने कुऱ्हाडीने वार केले त्यात भावाचा जीव (Murder) गेला. ही घटना बारामती तालुक्यातील मोढवे गावात काल घडली. 

तायप्पा मोटे अस मयत व्यक्तीचे नाव आहे. रामा मोटे आणि तायप्पा मोटे हे सख्खे भाऊ आहेत. रामा मोटे यांनी शेतात जाण्याच्या रस्त्यावर लाकडाचा ओंडका टाकला होता. आडवा ओंडका का टाकला, असा प्रश्न तायप्पाने रामा मोटेला प्रश्न विचारला. यावरुन दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर रामा मोटे याने सख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तायाप्पा यांची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामा मोटे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शेतात ये-जा करण्याच्या रस्त्यावर ओंडका टाकला होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना धमक्या दिल्या. मारुन टाकीन  असंही धमकावलं. वाद टोकाला गेला आणि कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. पहिला वार तायप्पा यांनी चुकवला मात्र दुसरा वार त्यांच्या पायावर आला. यातच त्यांचा जीव गेला. 

कोंढव्यात देखील किरकोळ वादातून घेतला होता जीव

चार दिवसांपुर्वी पुण्यातील कोंढवा येथे एका 23 वर्षीय तरुणाची नागरीकांसमोरच वार करून हत्या करण्यात आली होती. कोंढवा येथील शिवनेरी नगर येथील महेश गुजर असे मृताचे नाव होतं. ही भीषण हत्या घडल्याने परिसरातील दुकानदारांनी शटर बंद करून ते परिसर सोडून पसार झाले होते. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले होते. पीडित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तरीही त्यांनी त्याला मदत करण्यास, रुग्णालयात नेण्यास किंवा पोलिसांना कॉल करण्यास अनेकांनी नकार दिला होता. त्याची बहीण सोनी गुजर हिने कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी राजेश पवार, कृष्णा मराठे, सचिन राठोड, अमर गव्हाणे, गणेश हाके यांना ताब्यात घेतले होते.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget