पुणे : तब्बल 55 दिवसानंतर पुण्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर कार्यकर्त्यांच्या गर्दीत प्रचार करताना पहायला मिळत होते.  मात्र प्रचार थांबताच धंगेकर नेहमीप्रमाणे घरच्या प्रपंच्यात रंगलेले पहायला मिळाले. सौ धंगेकरांसोबत रविंद्र धंगेकर हे मंडईत भाज्या खरेदी करताना पहायला मिळाले. 


पुण्यात लोकसभेच्या निवडणुतील यंदा तीन तगडे उमेदवार उतरले आहे. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे अशी तिहेरी लढत होत आहे. मागील साधारण महिन्याभरापासून तिन्ही उमेदवार प्रचारात व्यस्त होते. त्यातच रवींद्र धंगेकरांनीदेखील जोमात प्रचार केला. 


धंगेकर हे त्यांच्या टू व्हिलरवरुन प्रचार कऱण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकसभेचा प्रचार काल संपला. हा प्रचार संपताच पत्नी प्रतिभा धंगेकरांसोबत स्कूटर वरून पुण्यात फिरताना दिसले. त्यानंतर दोघांनी मिळून भाजी खरेदी केली. त्यानंतर थेट तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. एकंदरीत धंगेकर आपला फॅमिली टाईम एन्जॉय करताना दिसले. 


सर्वसामान्यांचा नेता म्हणून रवींद्र धंगेकरांची पुण्यात ओळख आहे. त्यात टू व्हिलरवरुन प्रचार करताना ते दिसतात. मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी रवींद्र धंगेकर यांनी चाळीस वर्षांच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि कसबा काबीज केलं.  पुण्यात ते प्रचंड लोकप्रिय आहे. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख आहे. यंदा याच कारणामुळे धंगेकरांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर धंगेकर लोकसभेसाठी रिंगणात उतरले. प्रचार केला. त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या अगदी राहुल गांधींनीदेखील धंगेकरांसाठी पुण्यात सभा घेतली. रवींद्र धंगेकरांनी अनेकदा भाजपवर टीका केली आता पुणेकर नेमकं धंगेकरांना पसंती देतात का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


पुण्यात यंदा तिहेरी लढत होत आहे. तिन्ही तगडे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहे. रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे तिघांनीही जोरदार प्रचार केला आहे. यात आता पुण्यात पुणेकर नेमकं कोणाला मतदान करतील, हे बघावं लागणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Loksabha Election : मतदारांना उन्हाचा, पावसाचा त्रास होणार नाही; मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज


शिरूर लोकसभेसाठी ढळढळराव नको अविचल हवा; भास्कर जाधवांची तुफान फटकेबाजी


Pune Swiggy Offer : पुणेकरांनो मतादानाच्या दिवशी Swiggy वर ही भन्नाट ऑफर; शाई दाखवा अन्...