पुणे : मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी (Pune Loksabha Election 2024) अनेक प्रयत्न केले जातात. त्यात अनेक ठिकाणी निवडणूक आयोगातडूनदेखील विविध योजना राबवल्या जातात. मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावं, यासाठी स्विगीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. स्विगी डाइनआऊटची पुण्यात मतदानाच्या दिवशी आकर्षक डायनिंग ऑफर देणार आहेत. मतदारांनी त्यांचं शाई लावलेलं बोट दाखवलं तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.



13 मे ला पुण्यात मतदान आहे. त्यानिमित्त स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. सोमवारी शहरात मतदान होणार आहे. त्यानिमित्त स्विगीने मोठ्या हॉटेलमध्ये मतदारांना आकर्षक सूट दिली आहे.  13 मे ला बोटाला लावलेली शाई दाखवून पुणेकरांना जेवण्याच्या बिलात 50 टक्क्यांची सूट मिळेल. एफिंगट बिस्ट्रो, सर्किट हाऊ, द मार्केट- द वेस्टिन, इस्काडा ऑल डे किचन अँड बार, स्काय स्टोरीज, सर्किट हाऊस अशा अनेक हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे. 


नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय व्हावं आणि मतपेटीच्या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकला जावा ही स्विगी डाइनाऊटची भूमिका यामुळे अधोरेखित होते. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं हा स्विगी डाइनआऊट आणि शहरातल्या हॉटेल्सचा मानस आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना स्विगी डाइनआऊटचे प्रमुख स्वप्नील बाजपेयी म्हणाले, “मतदान हा फक्त हक्क नाही. ती एक जबाबदारी आहे. नागरिकांनी सक्रिय व्हावं यासाठी स्विगी डाइनआऊट शहरातल्या सर्वोत्तम रेस्टॉरंट बरोबर सहभागी झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही पुणेकरांना मतदान करण्याचं आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये तुमचे आवडत्या पदार्थावर ताव मारण्याचं आवाहन करत आहोत. नागरिक त्यांच्या अधिकाराचा वापर करून देशाचं भविष्य घडवण्यात सहभाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यासोबतच पुण्यात अध्या किंमतीत पॉट आईस्क्रिमदेखील निम्म्या किंमतीत मिळणार आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. ही टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान