नारायणगाव, पुणे : बाळासाहेब ठाकरेंशी आणि बाळासाहेबांच्या (Shirur Loksabha election) विचारांशी गद्दारी करून स्वार्थासाठी सतत पक्ष बदलणाऱ्या आढळरावांना आता घरी बसावा आणि छत्रपतींना आदर्श मानून अचल, अविरत कार्यरत असणाऱ्या निष्कलंक अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवून गद्दारांना मातीत गाडा, असं आवाहन शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ नारायणगावच्या सभेत केलं.


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली, तेव्हा ते अत्यवस्थ होते, अशा वेळी शिवसेनेतील काही गद्दार नेत्यांनी त्यांचा घात करून राज्यातील लोकहितवादी सरकार पाडण्याचं काम केलं आहे, यांपैकी आढळराव एक आहेत, त्यांचं नाव आढळराव आहे, मात्र ते सहत ढळ ढळ करत असतात, त्यामुळे त्यांना घरी ढळू द्या आणि आपल्या शिवाजन्मभूमीचा अचल, अविरत कार्यरत असणारा मावळा अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असंही आवाहन त्यांनी केलं. 


शिरूर लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अमोल कोल्हे यांनी या मतदार संघाचं नाव सबंध देशात तर पोहोचवल आहे, त्याहीपेक्षा त्यांनी आदराचं एक स्थान निर्माण करून आपल्या मतदारसंघाचा गौरव वाढवला, देशभरात कुठेही गेलं तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिरूर मतदार संघाचे प्रतिनिधी असणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या भाषणाची चर्चा ऐकायला मिळते, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.


भाजपा आणि संघाने छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं, मात्र अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सबंध जगासमोर आणला. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असणाऱ्या वढू तुळापूर साठी महाविकास आघाडीने तब्बल 250 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणाऱ्या शिवाजन्मभुमीच्या या मावळ्याला पुन्हा एकदा संसदेत पाठवून राष्ट्रीय कार्य पार पाडा असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.


शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्याशी तगडी लढत आहे. अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात उतरले होते. तर आढळराव पाटलांसाठी अजित पवारांनी जंग जंग पछाडला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आता कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान