Ravindra Dhangekar Pune Election 2026: रवींद्र धंगेकरांनी मतदानाच्या आदल्या दिवशी डाव टाकला, भाजप नेत्याचा डान्सबारमधील व्हिडीओ बाहेर काढला
Ravindra Dhangekar Pune Election 2026: निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर करत भाजपवर हल्लाबोल करत बॉम्ब टाकला आहे.

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान (Pune Election 2026) उद्या पार पडणार आहे. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे पालिका निवडणूक चर्चेत आली, राज्यात सत्तेत असलेले पक्ष पालिका निवडणुकीत (Pune Election 2026) वेगवेगळे लढत असल्याचं दिसून आलं, तर रोज मांडीला मांडी लावून बसणारे नेते देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. तर पुण्यात अनेक विविध घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक युध्द चर्चेत आलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये काही गुन्हेगारांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली, त्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आला, तर आता निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर करत भाजपवर हल्लाबोल करत बॉम्ब टाकला आहे.
धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत, असा हल्लाबोल त्यांंनी केला आहे. तर प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो आणि या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
धंगेकर यांची सोशल मिडीया पोस्ट
"भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो. आणि या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत.असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात."
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 13, 2026
खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत.
प्रभाग… pic.twitter.com/Mxu8PkYTHs























