एक्स्प्लोर

Raj Thackeray: छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या

Raj Thackeray: संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्यानंतर रमेश परदेशी यांना त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर झापल्याचे पाहायला मिळाले.

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यात घेतलेल्या शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कठोर आणि स्पष्ट भाषेत पक्षातील शिस्त व कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले.

रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी याला कार्यकर्त्यांच्या समोर झापलं.  “छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा," असे म्हणत राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले.  

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पद सोडा; राज ठाकरे यांचा इशारा

यानंतर राज ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामगिरीबाबत प्रश्न विचारले. “इतके दिवस काय काम केले? मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत?” असे विचारत त्यांनी कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले. अनेक पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की, “काम करायचं नसेल तर पद सोडा. जबाबदारी न निभावणाऱ्यांना पक्षात ठेवण्याची गरज नाही. अशांना थेट काढून टाका,” असे इशारा त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरेंच्या या शब्दांनंतर काही शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी शांत राहिले, काहींनी माना खाली घातल्याचे पाहायला मिळाले.

Raj Thackeray: राज ठाकरे बैठक संपवून निघून गेले 

दरम्यान, शाखाध्यक्षांची बैठक ही किमान एक ते दोन तास चालणं अपेक्षित होतं. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्न त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या बाबत असलेली रणनीती तसेच मतदार यादी यांच्यातील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचा मूळ उद्देश होता. मात्र शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून निराशाजनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणं पसंत केल्याचे दिसून आले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Devendra Fadnavis on Parth Pawar: अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Baramati News: “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget