एक्स्प्लोर
अखेर पुण्यावर वरुणराजाची कृपा
पुणेः मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर यंदाच्या मोसमातला पहिलाच मोठा पाऊस पुण्यात दाखल झाला आहे. काल संध्याकाळनंतर रात्रभर पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाला. ज्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत अर्धा टीएमसीची वाढ झाली आहे.
पुण्यात आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत 73 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. शिवाय पुणे जिल्ह्यात तूरळक सरी बरसल्यानं शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास पुणेकरांवरील पाणी संकट टळण्यास मदत होणार आहे. दरम्यान मराठवाडा, वदर्भासह मुंबईमध्ये जोरदार पाऊस होत असताना पुण्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement