एक्स्प्लोर

Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवनातील जलसाठ्यात 3.94 टक्क्यांची वाढ

Pavana Dam Update: पिंपरी चिंचवडकरांना आणि मावळातील शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Pavana Dam Update: पुणे शहर परिसरामध्ये दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहर परिसरातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. पिंपरी चिंचवडकरांना आणि मावळातील हजारो शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या(Pavana Dam) पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत असून ही आनंदाची बातमी नागरिकांसाठी आहे. 

पवना धरण(Pavana Dam) परिसरात काल(शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज (रविवारी) सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात(Pavana Dam) 17.43 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 11.34 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे. मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आता मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. 

आज पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

आज(रविवारी) जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची(Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात 100 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. 

मावळ, भीमाशंकर परिसरात 200 मिमीच्या वर पावसाची नोंद

भोर तालुक्यातील शिरगावमध्ये 121 मिलिमीटर, हिरडोशी 120 मिलिमीटर, भूतोंडे 166 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. वेल्हा तालुक्यात वेल्हा 128 मिलिमीटर, गिसर 135 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालूक्यातील उजनी खंडाळा 235 मिलिमीटर पावसाची(Rain) नोंद झाली आहे. 
भीमाशंकर चासकमान भागात ही  208 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. 

लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी 

मुसळदार पाऊस(Rain) आणि हिरवा निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी लोणावळ्यात(Lonavala)पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विक एंडला या भागामध्ये मोठ्या पर्यटक येत असतात. मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget