एक्स्प्लोर

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू? चार किलोमीटरच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च

शहरात अनेक उद्यानं असताना रस्त्याची रुंदी कमी करुन लोकांना बसण्यासाठी करण्यात आलेली सोय बुचकळ्यात टाकणारी आहे.

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या चार किलोमीटरच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय या सुशोभिकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूककोंडीत भरच पडली आहे. स्मार्ट सीटीच्या नावाखाली पुण्यात काय सुरू आहे? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पुण्यातील एफ सी रस्ता, जे एम रस्त्याच्याकडेला लोकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आकर्षक कमानी, रंगीबेरंगी खांब आणि पुरेशी सावली यामुळे अनेक जण या ठिकाणी तासन् तास बसलेले पाहायला मिळतात. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अर्थात एफ सी रोड आणि त्याला समांतर असलेल्या जंगली महाराज रस्ता अर्थात जे एम रोडवर अशाप्रकारे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे.

मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या या सुशोभिकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी मात्र कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे रस्ता वाहनांसाठी आहे की लोकांना बसण्यासाठी असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. शहरात अनेक उद्यानं असताना रस्त्याची रुंदी कमी करुन लोकांना बसण्यासाठी करण्यात आलेली सोय बुचकळ्यात टाकणारी आहे.

एफ सी रोडच्या दोन आणि जे एम रोडच्या दोन अशा एकूण चार किलोमीटरच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पण या सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या काही झाडांवर मात्र संक्रांत आली आहे. नैसर्गिक सौंदर्य नष्ट करुन कृत्रिम सुशोभिकरण केलं जात असल्याच येथे पहायला मिळत आहे.

स्मार्ट सीटीच्या माध्यमातून पुण्यातील काही निवडक रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पण फक्त एफ सी रोड आणि जे एम रोड म्हणजे पुणे आहे का? शहरातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेचे काय ? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Embed widget