(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Water Supply News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शहरात पाणीकपातीचं (Water Cut) संकट ओढावलं आहे.
Pune Water Supply News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शहरात पाणीकपातीचं (Water Cut) संकट ओढावलं आहे. फेब्रुवारी महिना उजडला अन् पुणेकरांवर (Pune News) पाणीकपातीचं संकट उभारलं आहे. दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पुण्यातील काही भागामध्ये पाणीकपात (Pune Water Supply) होणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) पाणी पुरवठा विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती HLR टाकीसाठी (गोल व चौकोनी) विद्युत, पंपींग व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. पुण्यातील सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे विद्युत, पंप व स्थापत्य विषयीची कामे करायची असल्याने या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. 42,46), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.
पुण्यात पाण्याचा तुडवडा
यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. त्यामुळे पुण्यातील धरणं ही 100 टक्के भरली नाहीत. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचे वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला होता.
आणखी वाचा :
प्रियकराचं डबल डेटिंग, अपमानास्पद वागणूक; प्रियसीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य!