(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Varuna Drone : चाकणच्या तरुणांनी तयार केले ड्रोन, दुर्गम भागात मदतकार्य पोहोचवणं सुलभ, नेव्हीच्या ताफ्यात दाखल होणार
Varuna Drone : दुर्गम भागात एखादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तिथं ड्रोन पोहचलं अन त्याच ड्रोनमध्ये बसून त्या व्यक्तीची सुटका झाली तर....
Pune Varuna Drone : दुर्गम भागात एखादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तिथं ड्रोन पोहचलं अन त्याच ड्रोनमध्ये बसून त्या व्यक्तीची सुटका झाली तर. हे वाचल्यावर तुम्हाला वाट्टेल आम्ही एखादी चित्रपटाची कथा सांगतोय. पण आश्चर्यकारक वाटणारी कथा आता लवकरच सत्यात उतरणार आहे. हे सत्य वरुणा ड्रोनच्या माध्यमातून सर्वांना पाहता अन अनुभवता ही येणार आहे. कारण हा वरुणा ड्रोन इंडियन नेव्हीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज होतंय. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वरुणा ड्रोनच प्रात्यक्षिक ही पार पडलंय. या आगळ्या-वेगळ्या ड्रोनची निर्मिती पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने या ड्रोनची निर्मिती केलीये.
चाकण एमआयडीसीचं आधीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे. आता त्यात सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने आणखी भर घातली आहे. सलग चार वर्षे परिश्रम घेत त्यांनी वरुणा ड्रोन साकारलं आहे. इंडियन नेव्हिने त्यांच्यासमोर जे आव्हान ठेवलं होतं, ते आता सत्यात उतरत असल्याचं कंपनीचे सहसंस्थापक मृदुल बब्बर यांनी दिली. एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर एखादी वस्तू अथवा अगदी एखाद्या व्यक्तीला स्थलांतर करायचं आहे. त्यासाठी आम्हाला ड्रोन बनवून मिळेल का? असा प्रश्न नेव्हीने आमच्यासमोर उभा केला होता. त्याचं उत्तर शोधत असताना आम्ही इथपर्यंत पोहचलोय. यासाठी अनेक कल्पना लढवत, वेगवेगळे प्रयोग साकारत हे वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन निर्माण झालं. जे एक किमी उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकतं. 20 ते 25 किमी अंतर पार करतं. एकदा चार्ज केल्यास यातून 25 ते 30 मिनिटांचा प्रवास करता येतो. अर्धा तासांत हे ड्रोन 36 किमीचं अंतर कापू शकतं. 130 किलो वजनाची व्यक्ती अथवा महत्वाची वस्तू स्थलांतर करू शकते. अति दुर्गम भागात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून स्वयंचलित, रिमोट अथवा कॉम्प्युटर अशा तीन पद्धतीने ऑपरेट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलीये. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आलीये. यासाठी ड्रोनमध्ये 16 मोटार बसविण्यात आल्यात, पैकी चार मोटार जरी बंद पडल्या तरी हे ड्रोन सुरक्षीत स्थळी पोहचू शकतं. शिवाय मोटार ऑपरेट करणाऱ्या चार कॉम्प्युटर पैकी एक जरी खराब झालं तरी सुरक्षित प्रवास होऊ शकतो. विना इंधन केवळ बॅटरीवर हे उड्डाण घेत शिवाय एक नव्हे तर आठ बॅटरी ड्रोनमध्ये उपलब्ध आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण ड्रोनची पहिली चाचणी यशस्वी झाल्याचा दावा कंपनीचे इंजिनियर सौरभ पाटील यांनी केलाय. पुढच्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ही हे ड्रोन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भारतीय बनावटीचा हा वरुणा ड्रोन लवकरच इंडियन नेव्हीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या वरुणा ड्रोनद्वारे आपल्याला बचावकार्य पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
पाहूयात वरुणा ड्रोनची वैशिष्ट्य काय आहेत.
- 1 किमी उंचीपर्यंत उड्डाण घेते.
- 20 ते 25 किमी अंतर पार करते
- 25 ते 30 मिनिटांचा प्रवास करता येतो.
- अर्धा तासांत 36 किमीचं प्रवास पूर्ण करतं.
- 130 किलो वजनाची व्यक्ती अथवा महत्वाची वस्तू स्थलांतर करू शकते.
- स्वयंचलित, रिमोट अथवा कॉम्प्युटर अशा तीन पद्धतीने ऑपरेट होऊ शकतं.
- 16 मोटार पैकी चार मोटार बंद पडल्या तरी ड्रोन सुरक्षीत स्थळी पोहचू शकतो.
- मोटार ऑपरेट करणाऱ्या चार कॉम्प्युटर पैकी एक जरी खराब झालं तरी सुरक्षित प्रवास होऊ शकतो.
- विना इंधन केवळ बॅटरीवर हे उड्डाण घेते, हे विशेष...
- सुरक्षेच्या आठ बॅटरी उपलब्ध असतात.
वरुणा ड्रोनमध्ये बसून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी... पाहा संपूर्ण व्हिडीओ
हे देखील वाचा-
- CWG 2022: 'अभी तो और मेडल आने बाकी हैं!' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं भारतीय खेळाडूंसाठी खास ट्वीट
- CWG 2022: यालाचं म्हणतात, जगावर छाप सोडणं; सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानचा वेटलिफ्टर म्हणतोय, 'मीराबाई चानू माझी प्रेरणास्रोत!'
- Country-wise Medal Tally: सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही भारताची पदकतालिकेत घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम