एक्स्प्लोर

Pune Crime Terrorist: पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं

Pune Crime Terrorist: पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो.

पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान, तो चेन्नईहून परत आल्यानंतर त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे (Pune Crime News) स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. हंगरकेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आले आहेत. जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत त्यांनी आणखी कोणाला अलकायद्याचे सदस्य होण्यासाठी त्याने माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखोचे पॅकेज तो घेतो. (ATS) 

एटीएस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले. असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.(Pune Crime News)

पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते. दरम्यान, एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी काही संबंध होता का, त्याच्याकडे हे साहित्य का आणि कोणत्या उद्देशाने होते, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून त्याच्या मित्राचीही चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाईल. तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे.

यापूर्वी आयसिस (ISIS) मॉड्यूलशी संबंधित तपासादरम्यान एटीएसने या महिन्यात काही संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी एकूण १९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सखोल चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी संपर्क होता का आणि त्या संपर्काचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडे अल-कायदाचे साहित्य का आणि कशासाठी ठेवले होते, हेही आम्ही तपासत आहोत. त्याच्या ताब्यात असलेल्या मित्राची चौकशी केली जाणार असून, त्याचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणीही केली जाईल. तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.” दरम्यान, एटीएसने या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील विविध भागांत सर्च ऑपरेशन राबवले होते. ही कारवाई एका जुन्या आयसिस मॉड्यूलच्या तपासाशी संबंधित होती. त्यावेळी संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान १९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Embed widget