एक्स्प्लोर
पवारांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली.
हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्याने, पवारांनी दिलेला शब्द पाळला.
...तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन : शरद पवार
वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं शरद पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते?
“मान्सून लांबला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसा उ. महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन.”, असे शरद पवार म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement