मुंबई : मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत उद्यापासून महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रातील परवापासून म्हणजे 16 तारखेपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. तिकडे औरंगाबादेत पुढील आठवड्यात म्हणजे 20 डिसेंबर पासून  महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार आहेत


पुणे महापालिका हद्दतील शाळा गुरुवारपासून (16  डिसेंबर) सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय. कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  


 मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असतानाच उद्यापासून मुंबईतल्या शाळा सुरु होत आहेत. कोरोनामुळं तब्बल दीड वर्षे शाळा बंद होत्या. पण आता उद्यापासून शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. 


काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना?



  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे

  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे

  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी

  • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे

  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये

  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात

  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी

  • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे

  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी

  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा

  • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे 

  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये

  • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.

  • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी

  • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे

  • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात

  • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी

  • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल



महत्त्वाच्या इतर बातम्या :