Bollywood Stars are Corona Positive :  बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी उपस्थित असलेल्या पार्टीतील इतरांना कोविडची लागण झाली आहे. सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महिप खान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर,  मलायका अरोरा, अभिनेत्री आलिया भट यांचे कोविड चाचणीचे अहवाल अद्याप आले नाहीत. 


एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड १९ संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महापालिका, आरोग्य कर्मचारी संसर्ग रोखण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मेहनतीवर बेजबाबदारपणे वागणारे नागरीक पाणी फेरत असल्याचे दिसत आहे. 


सुपरस्टार सेलिब्रेटींकडून कोविड १९ प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत पार्टी लाईफ सुरू आहे. त्याचा परीणाम आता दिसू लागला आहे. कोरोनाबाधित आढळेली अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक पार्टीमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे या दोन अभिनेत्री सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने या दोघींच्या संपर्कात आलेल्यांची आणि पार्टीत उपस्थित असलेल्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. 


अभिनेत्री करिष्मा कपूर, मलायका अरोरा, आलिया भट यांचा कोरोना चाचणी अहवाल आज येण्याची शक्यता आहे. 


मुंबई महापालिकेकडून करीना कपूरची इमारत सील


अभिनेत्री करीना कपूर राहात असलेली सद्गुरु शरण बिल्डिंग करीना कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर सील करण्यात आली आहे. दिग्दर्शक करण जोहर राहत असलेली इमातरदेखील सील करण्यात आली आहे.