पुणे : तीन दिवसांपूर्वी पुणे विमानतळावर एका उच्च शिक्षित तरुणाला बनावट पासपोर्ट आणि बनावट विमानाचं तिकीट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. खरंतर हा तरुण उच्चशिक्षित होता आणि आई-वडिलांनी सतत तगादा लावल्यामुळे नोकरीसाठी परदेशात चाललो असल्याचे सांगत विमानतळावर आला होता. परंतु विमानतळावरील सुरक्षारक्षकांना त्याचा संशय आला आणि त्याचा बनाव उघड पडला.


पुण्यात राहणाऱ्या असिमने बिटेक इंजिनीअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षे त्यांना परदेशात नोकरी देखील केली. लॉकडाऊन लागण्यापूर्वीच तो भारतात आला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्ष तो घरातच बसून होता. उच्च शिक्षण घेतलेल्या पोरगा घरातच बसून असल्याने सेवानिवृत्त झालेल्या आईवडिलांनी त्याच्या मागे पुन्हा एकदा नोकरी करण्याचा तगादा लावला. या काळात त्याने चार ते पाच ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत ही दिली. परंतु त्याने परदेशातच नोकरी करण्याचे ठरवले होते. परंतु दररोजच्या आई वडिलांच्या तगाद्याला कंटाळून त्याने एक प्लॅन तयार केला.परंतु हा प्लॅन पूर्णपणे फसला.


त्याने बनावट व्हिसा आणि बनावट विमान तिकीट तयार केले आणि आईवडिलांना कॅनडात नोकरी मिळाल्याचे सांगून तो कॅनडात जाण्यासाठी निघाला. मुलाला नोकरी मिळाल्याचे समजल्यानंतर आई वडील आनंदी झाले. मुलाला सोडण्यासाठी ते पुणे विमानतळावर आले. आई वडीलांना भेटून असीम विमानतळावर गेला. काही वेळ आत घालवल्यानंतर तो बाहेर पडू लागला..परंतु तेथील सुरक्षारक्षकांनी त्याच्या तिकीट आणि व्हिजाची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली..


असीमने परदेशात नोकरीला जात असल्याचे सांगून काही दिवस मित्राकडे राहण्याचा प्लॅन केला होता. यासाठी त्याने घरीच बनावट व्हिजा आणि तिकीट तयार केलं होतं. परंतु विमानतळावरच त्याचा हा प्लॅन उघडकीस आला.असीम आता पोलिस कोठडीत आहे..एका छोट्याश्या चुकीमुळे संपूर्ण आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :