Sawai Gandharva : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द
Sawai Gandharva : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव रद्द करण्यात आला आहे.
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav : दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या करोना रुग्णांमुळे राज्य सरकारने काही निर्बंध लावले आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रसिंकाची निराशा झाली आहे. 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव रद्द करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशानाकडून परिस्थितीनुसार निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळेच यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.
यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, अशी रसिकांची इच्छा होती. पण या महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा कालावधी पाहण्यात आली, तसेच सद्याची कोरोना परिस्थितीत हा महोत्सव रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
दोन महिन्याखाली कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानंतर राज्य सरकारकडून पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सवाला परवानगी देण्यात आली होती. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करत मोहत्सव आयोजित करण्यात आला होता. तारीखही ठरली होती. पण आता पुन्हा एकदा राज्यात आणि पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करु नये, राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोमणा
सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live