Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा! आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी
Pune Rain Update: पुणे शहर परिसरात आज आणि उद्या (रविवारी व सोमवारी) घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शहरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain Update) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain Update) इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कुठं ऑरेंज (Orange alert) तर कुठे यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज हवामान विभागाने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर आज आणि उद्या पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain Update) इशारा दिला आहे.
आज, उद्या शहरात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे शहर परिसरात आज आणि उद्या (रविवारी व सोमवारी) घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा (Heavy Rain Update) इशारा दिला आहे. शहरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुणे आणि सातारा या परिसरात घाटमाथ्यावर पावसाचा जोर (Heavy Rain Update) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपासून शहरात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यासह घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा अंदाज
पुण्यासह सातारा घाटमाथ्यावर आज आणि उद्या (रविवारी आणि सोमवारी) अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भात देखील मुसळधार पावसाचा (Heavy Rain Update) इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुणे, सातारा व विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे पुणे व सातारा घाटमाथ्याचा भाग आणि संपूर्ण विदर्भात पुन्हा पाऊस वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या भागाला कोणता अलर्ट जारी
ऑरेंज अलर्ट: पुणे (८, ९), सातारा (८, ९).
यलो अलर्ट : पालघर (८, ९), ठाणे (८, ९), रायगड (८ ते ११), रत्नागिरी (८ ते ११), जळगाव (११), नाशिक (८, ९), पुणे (१०), कोल्हापूर (८ ते १०), सातारा (१०), जालना (११), परभणी, नांदेड, बीड, हिंगोली (११), अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ (८ ते ११).