Pune Rain Update: पुण्यातील मुसळधार पावसाने झोडपले; रवींद्र धंगेकर सत्ताधाऱ्यांवर बरसले, म्हणाले...
पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सत्ताधाऱ्यांवर बरसले. त्यांनी महापालिकेत नालेसफाईत झालेल्या घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली
पुणे : पावसाळ्यातील (Pune Rain) पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. लोकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या अक्षरश: रस्त्त्यावरील पाण्यात वाहू लागल्या. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सत्ताधाऱ्यांवर बरसले. त्यांनी महापालिकेत नालेसफाईत झालेल्या घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. पाऊस झाला मोठा, नालेसफाई घोटाळा झाला खोटा, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोलाही लगावला आहे.
संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. तसंच या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. तर तिकडे पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांच लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तर लोहगाव वाघोली रोड परिसरात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली होती.
काय म्हणाले धंगेकर?
रविंद्र धंगेकर म्हणाले, आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे.
पुणेकर 2 तास वाहतूक कोंडीने संतापले
पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणेकर 2 तास वाहतूक कोंडीने संतापले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 12 जून दरम्यान पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणेकर 2 तास वाहतूक कोंडीने संतापले होते.
Video :
हे ही वाचा :