गडी एकटा निघाला...! राहुल कलाटेंच्या प्रचार गाण्यांचा सोशल मिडीयावर धुमाकूळ
प्रचार गाण्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रचार गाण्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून सेट करत आहेत आणि नवीन मतदार राहुल कलाटे यांना युथ आयकॉन म्हणून पाहतात.
Rahul kalate : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या बंडखोरीमुळे आता चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी बरोबरच राहुल कलाटेंचाही प्रचार जोरात सुरु आहे. सामान्यांच्या भेटी घेत, पदयात्रा काढत वरिष्ठांचा अशिर्वाद घेत त्यांचा प्रचार सुरु आहे. मात्र यातच त्यांच्या प्रचार गाण्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रचार गाण्यांना लोक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत आहेत. नवीन मतदार राहुल कलाटे यांना युथ आयकॉन म्हणून पाहत असल्याचं समोर आलेय.
‘ना कुठला पक्ष, ना कुठला नेता, माझा आधार फक्त मायबाप जनता’ आणि बटन शिट्टीचा दाबाल... अशी ही त्यांची प्रचार गाणी मतदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत. कलाटे हे विविध प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास या गाण्यांमधून नागरिकांना दिला जात आहे. कलाटे हे जल्लोषात प्रचार करत आहे. त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, विकासाचे प्रश्न अशा विविध समस्या आपण सोडवू, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे. पुनावळे, रहाटणी आणि पिंपळे निलख येथील मतदारांशी नुकत्याच झालेल्या भेटींमध्ये कलाटे यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
कलाटे यांची प्रमोशनल गाणी चिंचवड शहरात चर्चेत असून मतदार त्यांना व्हॉट्सअॅपवर शेअर करून पाठिंबा दर्शवत आहेत. विकासाचे प्रश्न सोडवण्यात कलाटे हेच त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत, असा विश्वास दिसत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना कलाटे यांना मतदारांचा कितपत पाठिंबा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी-भाजपला फोडला घाम
राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सगळ्या पक्षाकडून निवडणूक येण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यासेबतच तरुण नेतेही प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. काही दिवसच बाकी राहिल्यामुळे जल्लोषात प्रचार सुरु आहे. राहुल कलाटे कोणत्या नेत्याला नाही तर थेट जनतेला आणि समर्थकांना सोबत घेऊन प्रचार करताना दिसत आहे. मागील निवडणुकीत त्यांना जनतेनी चांगला पठिंबा दिला होता. शिवाय यावेळी वंचितनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची मतं फुटण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे. मात्र राहुल कलाटे यांना निवडून येण्याचा विश्वास आहे.