Pune Porsche car Accident Live Update : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरण: मोठी बातमी: विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. विशाल अग्रवालचे वडिल सुरेंद्र अग्रवाल त्यानंतर ड्रायव्हर आणि आता त्याच्यसोबत असणाऱ्या दोन मित्रांचीदेखील चोकशी होणार आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 May 2024 08:48 PM
उष्माघातमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील कवली येथे उष्माघात मुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून दुपारी घरी आलेल्या शेतकऱ्यांला सायंकाळी घाम आल्यामुळे अत्यवस्थ होऊन त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यास तातडीच्या उपचारासाठी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते. पुढील उपचारासाठी पाचोरा येथे घेऊन जात असताना त्यांचा उष्माघातमुळे मृत्यू झाला. प्रकाश भागवत तराल (वय 62) असे उष्माघातमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. 

विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 Pune Porsche car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


 
विशाल अग्रवाल कोर्टात हजर

पुणे ; विशाल अग्रवाल याची पोलीस कोठडी संपली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाच्या मागच्या दाराने कोर्टात आणलं. 

सहा आरोपींची कसून चौकशी सुरु

 Pune Porsche car Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यासाठी सहाही आरोपींना काही वेळात काढतील..


क्राइम ब्रांच युनिट 4 च्या कार्यालयात या सहाही आरोपींची चौकशी सुरू होती...


 
व्हिडीओ फेक आहे : पुणे पोलीस आयुक्त

 


 आज पुणे  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला आहे.अमितश कुमार म्हणाले,  व्हिडीओ फेक आहेत. कुणी तयार केलेत ते तपासले आहेत.  अल्पवयीन आरोपीने तयार केलेले नाही. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.  


 
स्वत:च बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार; रवींद्र धंगेकर

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने चिरडून ठार केलेल्या (Pune Porsche Car Accident) दोन आयटी इंजिनिअर्सना न्याय मिळवून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्त कोणीही दोषी आहे असे मानत नाहीत कारण बिल्डर्सच्या पैशावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 


 
स्वत:च बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार; रवींद्र धंगेकर

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने चिरडून ठार केलेल्या (Pune Porsche Car Accident) दोन आयटी इंजिनिअर्सना न्याय मिळवून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्त कोणीही दोषी आहे असे मानत नाहीत कारण बिल्डर्सच्या पैशावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 


 
शांतिगिरी महाराज घेणार नाशिक पोलीस आयुक्तांची भेट; पुण्यातील अपघात घटनेच्या पार्श्वभूमीवर होणार भेट

 नाशिक : शांतिगिरी महाराज घेणार नाशिक पोलीस आयुक्तांची भेट


पुण्यातील अपघात घटनेच्या पार्श्वभूमीवर होणार भेट


नाशिक शहरातील अवैध धंदे बंद करावे.
-
नाशिक धार्मिक शहर असल्यानं त्याचे पावित्र्य राखावे याबाबतीत देणार निवेदन
-
नाशिक लोकसभा निवडणूक लढविल्यानं शांतिगिरी महाराज आलेच चर्चेत
-
राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढविल्याचा शांतिगिरी महाराजांनि दिला होता नारा
-
दुपारी12 जाणार पोलीस आयुक्त कार्यलयात जाऊन घेणार पोलीस आयुक्तांची भेट


 
पुणे अपघात प्रकरणातील आरोपींची पोलीस न्यायालयाला मागणार पोलीस कोठडी

Pune Porsche car Accident :  पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण मोठी अपडेट


या प्रकरणातील ६ ही आरोपींची पोलीस न्यायालयाला मागणार पोलीस कोठडी


आज दुपारी ३ वाजता याप्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार


विशाल अगरवाल याचा संभाजीनगरमधून जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक पथकाकडे


गाडीत बसलेल्या ३ पैकी २ मित्रांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी


मित्रांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिला जबाब


 
Pune Porsche Car Accident : अपघात झाला तेव्हा मी नाही, ड्रायव्हर गाडी चालवत होता; धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा

 Pune Porsche car Accident : अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवालनंदेखील त्याच्या जबाबत असाच दावा केल्याची माहिती मिळत आहे. 


 
Pune Porsche Car Accident : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...

Pune Porsche car Accident Case : पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांचीही होणार चौकशी

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरण: तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकरांचं ठिय्या आंदोलन

 Pune Porsche car Accident: कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील तपास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करत आहेत. 


 
Pune Porsche car Accident पुणे पोलिसांनी तपासला अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग

पुणे : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण


पुणे पोलिसांनी तपासला अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग


19 मे रोजी "ती" गाडी अगरवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली याचा देखील तपास


घरातून कोसी, तिथून ब्लॅक आणि तिथून अपघात स्थळापर्यंत संपूर्ण मार्गाचे सी सी टिव्ही फुटेज तपासले


फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण


महागडी गाडी ही अगरवाल यांच्या कंपनीच्या नावावर


गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे


 
Pune Porsche car Accident : धनिकपुत्राचे लाड बंद

 Pune Porsche car Accident : धनिकपुत्राला जेव्हा येरवाडा पोलीस ठाण्यात आले तेव्हा मागच्या दाराने त्याच्यासाठी पिझ्झा (Pizza) आणि बर्गर (Burger) आणण्यात आल्याचा आरोप झाला होता. मात्र, बालसुधारगृहात ( observation home) या धनिकपुत्राचे सगळे लाड बंद करत त्याला घरचे जेवण देण्यास मनाई करण्यात आली आहे. बालसुधारगृहात पहिल्या दिवशी या धनिकपुत्राला सकाळच्या नाश्त्याला पोहे, दूध आणि अंडी देण्यात आली. त्यानंतर त्याला प्रार्थनेसाठी नेण्यात आले. 


 
इतकं होऊनही मस्तवालपणा जाईना, अग्रवालांच्या निकटवर्तीयांची पत्रकारांशी अरेरावी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन लावण्याची धमकी

 Pune Porsche car Accident : अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाच्या मुजोरीचा अनुभव पुन्हा एकदा सर्वांना आला. या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना  चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेत असताना अगरवाल कुटुंबातल्या एकाने पत्रकारांशी अरेरावी करत धक्काबुक्की केली. दरम्यान सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस नेत असताना पत्रकार वारंवार छोटा राजनशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर काहीही न बोलता अगरवाल वारंवार आपला नातू अल्पवयीन असल्याचं बोलत होते.  


 
 Pune Porsche car Accident : पॉर्शे कारमधील व्हिडीओ ठरतील महत्त्वाचा पुरावा

 Pune Porsche car Accident : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर आरोप प्रत्यारोप आले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या तापासाला चांगलाच वेग आल्याचं दिसत आहे. विशाल अग्रवाल यांचे व़डिल सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालायात बोलवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरलादेखील बोलवण्यात आलं. या प्रकरणातील एक एक पुरावा पुणे पोलीस शोधून काढत आहेत. त्यातच आता पुणे पोलीस थेट 'पोर्शे'तील चित्रीकरणही तपासणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हे पोर्शेतील चित्रिकरण (व्हिडीओ) या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 


 

पार्श्वभूमी

 पुणे :  पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रोज एकेकाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. विशाल अग्रवालचे वडिल सुरेंद्र अग्रवाल त्यानंतर ड्रायव्हर आणि आता त्याच्यसोबत असणाऱ्या दोन मित्रांचीदेखील चोकशी होणार आहे. रविवारी 18 मेला रात्री अडीचच्या सुमारास विशाल अग्रवालच्या मुलाने भरधाव पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यात दोन इंजिनियरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १५ तासातच विशाल अग्रवालच्या मुलाला जामीन मंजूर करण्यात आला. या जामीनावरुन संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा कोर्टात हरज करुन त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली. याच प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यात येत आहे. 


 

 

 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.