एक्स्प्लोर

Amit Thackeray : कहानी मे ट्विस्ट! अमित ठाकरे वसंत मोरेंची नाराजी दूर करणार? भेटीत काय तोडगा निघणार?

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील डॅशिंग मनसे नेते वसंत मोरे यांना तातडीने मुंबईला बोलवून घेतलं आहे. संत मोरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होणार किंवा कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे ( Amit Thackeray) यांनी पुणे दौऱ्यादरम्यान डॅशिंग मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना तातडीने भेटायला बोलावून घेतलं आहे. वसंत मोरे मागील काही दिवसांपासून मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या  (Pune Mns) आणि त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. याच पाश्वभूमीवर वसंत मोरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होणार किंवा कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्या दरम्यान त्यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवलं आहे. नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही वसंत  मोरे आणि स्थानिक नेत्यांमध्ये धूसफुस सुरुच होती. मनसेचे अंतर्गत वाद रोज चव्हाट्यावर येत होते. हे अंतर्गत वाद दूर करण्यासाठी अमित ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. 

'मनसेच्या बैठकीत मोरेंनी मारली होती दांडी'

मनसेच्या अंतर्गत वादामुळे काही प्रमाणात मनसेत दोन गट पडले आहेत. वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली होती. निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत बाबू वागस्कर यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

अजित पवारांच्या ऑफरचं काय?

काही दिवसांपूर्वी वसंत मोरें यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली होती. 'तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाषेत वसंत मोरेंना राष्ट्रावादीत बोलावलं होतं. त्यामुळे आता वसंत मोरेंना अमित ठाकरेंनी बोलवल्यामुळे राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय 'तात्या काहीही करा पण मनसे सोडू नका', अशा प्रतिक्रीया वसंत मोरेंचे चाहते देत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget