पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे (Pune Police) पोलिसांनी कंबर कसली आहे. पुण्यातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा परेड काढण्यात येत आहे. पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची पोलीस ठाण्यात परेड काढण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार परेड काढण्यात येत आहे. 


सध्या सगळीकडेच निवडणुकीचे वारे सुरु आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यात कोयता गॅंग आणि गाडी तोडफोडीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यात अल्पवयीनपासून ते अट्टल गुन्हेगारांच्या टोळ्यांचाही समावेश आहे. याच सगळ्यांची पुणे पोलिसांकडून परेड काडण्यात येत आहे. त्यांना तंबी देण्यात येत आहे. 

 

पुणे आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण 109 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगाराना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना समज देण्यात येत आहे. आज सकाळी 9 वाजेपासून पुण्यातील प्रत्येक पोलीस चोकीत गुन्हेगारांना बोलवण्यात आलं आहे. साधारण आतापर्यंत 1000 गुन्हेगारांना बोलवून त्यांना समज दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, कोयता हल्ल्यातील गुन्हेगार, गाड्यांची तोडफोड करणारे गुन्हेगार आणि गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. 

 

सगळे आरोपी चिडिचूप उभे!


सगळ्या आरोपींना बोलवून त्यांना पोलिसांकडून दम दिला जात आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही किंवा शहाणपणा करायचा नाही, केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला जात आहे. एरवी गावगुंड म्हणून वावरणारे आणि परिसरात दहशत माजवणारे पोलीस ठाण्यात चिडिचूप उभे दिसत आहेत. यापूर्वीही अशा प्रकारे अट्टल गुन्हेगारांची परेड काढण्यात आली आहे. त्यावेळी अट्टल टोळ्यांच्या प्रमुखांना बोलवून त्यांना दम दिला होता. 

 


इतर महत्वाची बातमी-


कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.


Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ